Homeसामाजिकस्वच्छता कर्मचाऱ्यांना पाॅश अॅक्ट २०१३ कायद्याचे प्रशिक्षण

स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाॅश अॅक्ट २०१३ कायद्याचे प्रशिक्षण

स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाॅश अॅक्ट २०१३ कायद्याचे प्रशिक्षण

तळेगाव दाभाडे : नगरपरिषद. होप फाॅर द चिल्ड्रन फाउंडेशन आणि अलिमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी वर्गासाठी कार्यस्थळी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंध कायदा२०१३(POSH Act2013) या कायद्याबाबत जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या पुढाकाराने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले प्रशिक्षक मिलिंद चव्हाण( पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते) यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मिलिंद चव्हाण म्हणाले की पॉश अॅक्ट २०१३ हा दिवाणी कायदा असून या कायद्यानुसार प्रत्येक कार्यालयीन स्तरावर अंतर्गत तक्रार समिती असणे बंधनकारक आहे.

तक्रारी गोपनीय पद्धतीने नोंदवल्या जातात तसेच जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे महिला तक्रार दाखल करू शकतात. महिलांनी निसंकोचपणे आपल्या हक्कासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. संस्थेच्या रूपाली धामणकर( प्रोग्रॅम अँड लॉजिस्टिक कार्डिनेटर महिला सुरक्षितता प्रकल्प) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छता निरीक्षक सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम तेजी, आरोग्य विभागातील देविदास पुंड, माहिती शिक्षण व प्रसारण टीमचे मनोज शेटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

मिळकत व्यवस्थापक व दिव्यांग विभाग प्रमुख मधुरा जोशी यांच्या हस्ते प्रमुख व्याख्याते मिलिंद चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी व एकूण १५० स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांना या कायद्याची जनजागृती पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. नगरपरिषदेच्या बालकल्याण विभागाच्या लिपिक अर्चना काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!