आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावात ‘FOLK लोक .मराठी लोककलेचा जागर
तळेगाव दाभाडे:मराठी संस्कृतीचा सुवास, लोककलेचा ठेका आणि मराठी अस्मितेचा जल्लोष — हे सर्व अनुभवायचे असेल, तर तारीख लक्षात ठेवा २० ऑक्टोबर २०२५, सायं. ६ वाजता, ठिकाण तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर!

या दिवशी तळेगावात रंगणार आहे एक आगळावेगळा सांस्कृतिक महाउत्सव “FOLK लोक – मराठी लोककलेचा जागर. आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा अनोखा उपक्रम महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा भव्य उत्सव ठरणार आहे.

“बारा कोसांवर बदलणारी भाषा” या म्हणीप्रमाणे, महाराष्ट्रात प्रत्येक प्रदेशात वेगळी कला, वेगळं रंगमंच आणि वेगळा लयताल आहे. कोकणातील सुरेख लावणी, मराठवाड्यातील उत्साही गोंधळ, पश्चिम महाराष्ट्रातील गगनभेदी ढोल-ताशे, तर विदर्भातील भारूड, गोंधळ, वग नाटकाची परंपरा — या सर्व कला एकाच मंचावर पाहण्याची सुवर्णसंधी मावळ वाशीयांना लाभणार आहे.
“मराठी लोककलेचा जागर” या मंचावर पारंपरिक पोशाख, लोकवाद्यांचा ठेका, नृत्याची झूल आणि गीतांचा दरारा . या सगळ्यांचा संगम होणार आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा अनोखा महाउत्सव सर्व वयोगटातील रसिकांना मंत्रमुग्ध करेल, यात शंका नाही.

या कार्यक्रमाचा एक विशेष पैलू म्हणजे लोककलावंतांचा सन्मान. राज्यभरातील सुप्रसिद्ध व नवोदित कलाकार एकत्र येऊन आपल्या कलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा ठेवा जपतील.ही केवळ सादरीकरणांची मालिका नसून ही असेल मराठी अस्मितेचा, मातीच्या सुगंधाचा आणि लोकभावनांच्या प्रवाहाचा संस्कृतीसोहळा.
लोककलेच्या माध्यमातून गावागावातली परंपरा जिवंत ठेवण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक अर्थपूर्ण प्रयत्न ठरेल.

या उपक्रमामागे काही ठोस ध्येय आहेत महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि लोकसंगीताचे जतन व संवर्धन नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणे मराठी परंपरेचा अभिमान सर्वदूर पोहोचवणे या माध्यमातून तळेगाव केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही उजळून निघेल.
आयोजकांच्या वतीने सर्व तळेगावकरांना आणि परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या आगळ्या-वेगळ्या लोककला महाउत्सवात सहभागी व्हा, मराठी अस्मितेचा झेंडा उंचावू या, लोककलेचा सन्मान करू या आणि आपल्या संस्कृतीला मनःपूर्वक सलाम करू या.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















