Homeमहत्त्वाचेआमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा...

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

तळेगाव दाभाडे :  येथील विद्याविहार कॉलनीमध्ये आज ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. सुभेदार श्री. विष्णूजी पठाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या निनादात, “भारत माता की जय”च्या घोषणा देत नागरिकांनी या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विद्याविहार कॉलनीत सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला. लोकहिताच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या विकास प्रकल्पांसाठी एकूण १ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना सुशोभित आणि सुसज्ज पायाभूत सुविधा, व्यायामासाठी आधुनिक साधनसामग्री तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण झालेली कामे पुढीलप्रमाणे —

 • ओपन स्पेसचे सुशोभीकरण व विकास

 • सभागृहाचे बांधकाम

 • ओपन स्पेसला चेनलिंक कंपाउंड बसविणे

 • पादचारी मार्गाची उभारणी

 • डेकोरेटिव्ह लाइट पोलची बसवणूक

 • ओपन जिम साहित्याची उभारणी

 • लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसविणे व जुनी खेळणी दुरुस्त करणे

या लोकार्पण सोहळ्यास आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास गणेश खांडगे,  कृष्णाजी कारके, सुरेश धोत्रे, विजयकुमार सरनाईक, गणेश काकडे, बजरंग जाधव, शैलजाताई काळोखे, सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, सुरेश गायकवाड, सुहास गरुड, संजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात भाषण करताना मान्यवरांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. नागरिकांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांमुळे अशा प्रकारची उपयुक्त व दर्जेदार कामे यशस्वी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ध्वजारोहण व लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!