कामशेत पोलिसांनी ज्वलनशील केमिकल व रॉकेलचा अवैध साठा केला जप्त
कामशेत : मुंढावरे गावात इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकून कामशेत पोलिसांनी पावणेतीन लाखाचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा अवैध साठा जप्त केला आहे. बुधवार दिनांक २९ मे २०२५ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हा बेकायदेशीर साठा करून ठेवल्याचे आढळले आरोपी महिंद्र काळूराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रायणी ढाब्या मागे ज्वलनशील रसायने व पांढऱ्या रॉकेलचा अवैध साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पंच व पुरवठा निरीक्षक तनपुरे यांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे २८ बॅरल मध्ये २लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीचे अंदाजे ४हजार ८१० लीटर ज्वलनशील रसायन सदृश द्रव्य तसेच पांढऱ्या रॉकेल सदृश पदार्थ असा बेकायदेशीर साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे करत आहेत. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक फौजदार नितेद्र कदम, पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस हवालदार समीर करे, गणेश तावरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक काळे, गणेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल निशा लालगुडे यांच्या पथकाने केली आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















