Homeमहत्त्वाचेकामशेत ग्रामस्थांनी केलेल्या कुंभकर्ण जागो आंदोलनाला यश ३० टक्के करवाढ अखेर रद्द

कामशेत ग्रामस्थांनी केलेल्या कुंभकर्ण जागो आंदोलनाला यश ३० टक्के करवाढ अखेर रद्द

कामशेत : कामशेत ग्रामपंचायतने एकतर्फी पणे केलेली ३० टक्के घरपट्टी वाढ अखेर मागे घेण्यात आली आहे. कामशेत ग्रामस्थांनी या ३० टक्के घरपट्टी विरोधात सोमवार दिनांक ५मे २०२५ रोजी वडगाव पंचायत समोर कुंभकर्ण जागो आंदोलन केले होते.

या आंदोलनाला यश आले असून ३० टक्के करवाढ रद्द करण्यात आली आहे. ३० टक्के करवाढ रद्द करावी यासाठी कामशेत ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार केला होता तसेच वडगाव पंचायत समिती समोर सर्व ग्रामस्थांनी कुंभकर्ण जागो आंदोलन देखील केले होते.

कामशेत ग्रामपंचायत ने कोणतीही पूर्व सूचना न देता व नागरिकांना विश्वासात न घेता ३० टक्के कर वाढ लागू केली होती. कामशेत ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी मिळकतीचे कोणतेही फेर सर्वेक्षण न करता ही करवाढ जाहीर केली होती.

या अचानक वाढीव कराच्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केला होता तरीही कामशेत ग्रामपंचायतने नागरिकांना नोटिसा बजावून वाढीव कर भरण्यास भाग पाडले. त्यामुळे कामशेत ग्रामस्थांनी कुंभकर्ण जागो हे अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ३० टक्के वाढीव करास स्थगिती दिली आहे.

ज्यांनी कर भरला आहे त्यांच्या पुढील करातून ही रक्कम समायोजित करण्यात येणार आहे. कामशेत ग्रामपंचायतला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की विशेष ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे नवीन कार्यवाही करण्यात यावी. नियमानुसार फेर सर्वेक्षण. समिती गठीत करणे आणि अंतिम कर आकारणी यादी ग्रामसभेच्या मान्यतेनेच प्रसिद्ध करण्यात यावी.अशा स्पष्ट सूचना ग्रामपंचायतला देण्यात आल्या आहेत. कामशेत ग्रामस्थांनी जी एकजूट दाखवली त्यामुळे ही ३० टक्के करवाढ रद्द करण्यात आली आहे असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!