Homeताज्या बातम्याचारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली असून, चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. सोनाली विनोद कणसे (वय ३५, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तिचे वडील आप्पासो सुखदेव कदम (रा. गोतंडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान केशव हाइट्स, केशवनगर येथे ही घटना घडली. आरोपी विनोद लालासे कणसे (वय ३७) याने पत्नी सोनाली हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. त्याच संशयातून संतापाच्या भरात आरोपीने कोणत्यातरी वस्तूने तिच्या डोक्यावर, छातीवर तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली.

या गंभीर मारहाणीत सोनाली कणसे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरनं 114/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 115(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद दिनांक २५ एप्रिल रोजी सायं. ६:०८ वाजता करण्यात आली.

पोलीसांनी आरोपी विनोद कणसे यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ हे करत आहेत.

घटना गंभीर स्वरूपाची असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभागाचे श्री. गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले वडगाव(मावळ): वडगाव परिसरात एका घराबाहेर दिसून आलेल्या मांडूळ सापाचे वेळेत रेस्क्यू करून त्याला नवजीवन देण्यात...

error: Content is protected !!