Homeमहत्त्वाचेकामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

वडगाव मावळ : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या कामशेत येथील जागेवर शेतकरी भवन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीवर मंत्री पाटील यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संस्थेचे सभापती किरण हुलावळे व उपसभापती सुनीता अमोल केदारी यांनी दिली.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी व संचालक मंडळाने मुंबई येथील मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता केदारी यांच्यासह संचालक माणिक गाडे, शहाजी कडू, गणेश विनोदे, बाजीराव वाजे, प्रमोद दळवी, शरद नखाते, विष्णु घरदाळे, आशा मारुती खांडभोर तसेच सचिव किरण लोहर उपस्थित होते.

कामशेत येथील संस्थेची जागा ही मध्यवर्ती व प्रशस्त असून सध्या याठिकाणी गोडाऊन, दुकाने आणि कार्यालयीन इमारती आहेत. मात्र या इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, त्याच ठिकाणाहून संस्थेचे विविध कामकाज सुरू आहे. तसेच मूलभूत सुविधांचा अभाव आणि अपुरी जागा यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामुळे याच ठिकाणी आधुनिक शेतकरी भवन उभारल्यास मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, मार्गदर्शन केंद्र, साठवण सुविधा यांसारख्या सोयी निर्माण होऊन संस्थेची कार्यक्षमता व दर्जाही उंचावेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!