Homeताज्या बातम्यातळेगावचा क्रिकेटरत्न राज्य पातळीवर झळकला आदित्य मानेची अंडर-१४ मध्ये महाराष्ट्र संघात निवड

तळेगावचा क्रिकेटरत्न राज्य पातळीवर झळकला आदित्य मानेची अंडर-१४ मध्ये महाराष्ट्र संघात निवड

तळेगावचा क्रिकेटरत्न राज्य पातळीवर झळकला आदित्य मानेची अंडर-१४ मध्ये महाराष्ट्र संघात निवड

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या क्रीडाभूषवणात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तळेगाव दाभाडे येथील कु. आदित्य प्रविण माने याची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवरील संधीपर्यंत पोहोचण्याचा आदित्यचा प्रवास अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारा आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची सांगड घालत आदित्यने महाराष्ट्र संघाची जर्सी परिधान करण्याचा मान मिळवला आहे.

महाराष्ट्रातील ५४ निमंत्रित संघांच्या अत्यंत अटीतटीच्या आणि दर्जेदार स्पर्धेत आदित्यने आपल्या फिरकी गोलंदाजीने अक्षरशः वर्चस्व गाजवले. ११ सामन्यांतील २० डावांत त्याने तब्बल ८२ गडी बाद करत स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून आपले नाव कोरले. केवळ गडी बाद करण्यापुरतेच नव्हे, तर निर्णायक क्षणी फलंदाजांवर दबाव निर्माण करून सामन्यांची दिशा बदलण्याची त्याची क्षमता निवड समितीच्या विशेष पसंतीस उतरली.

सामन्यानंतर सामन्यात आदित्यची गोलंदाजी अधिक धारदार होत गेली. टप्प्याटप्प्याने लय पकडणारी त्याची फिरकी, अचूक टप्प्यावर पडणारा चेंडू आणि भेदक वेगबदल यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी तो जणू ‘फिरकीचे कोडे’ ठरला. याच कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्र संघात निवड निश्चित झाली.

या निवडीमुळे आदित्य आता गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र आणि बडोदा हे बलाढ्य संघ सहभागी होणार असून, देशातील सर्वोत्तम युवा खेळाडूंविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी आदित्यसमोर आहे. या स्पर्धेतील कामगिरी पुढील राष्ट्रीय पातळीवरील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड येथील अॅंबिशिअस स्पोर्ट्स क्लबकडून खेळणारा आदित्य हा मुळात फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या क्रिकेट प्रवासात अनेक अनुभवी प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. स्पर्धेच्या काळात माजी रणजी खेळाडू सुनिल मुथा सर, क्रिकेट प्रशिक्षक मनिष देसाई सर आणि जयंत पानसे सर यांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या खेळात तांत्रिक शिस्त आणि डावपेचांची समज अधिक पक्की झाली.

मावळ तालुक्यातील लेदर बॉल क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे अनिल नाईक सर यांच्याकडे आदित्यने क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पुढे गोलंदाजी प्रशिक्षक विवेक पांडे सर, तसेच अॅचिव्हर्स क्रिकेट अॅकॅडमीचे राकेश पिल्ले सर आणि प्रसाद सावंत सर यांनी त्याच्या कौशल्याला योग्य दिशा दिली. तळेगाव दाभाडे येथील स्पोर्ट्स स्पेशलिस्ट फिजिकल ट्रेनर तुषार देशप्रभू सर यांनी त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर विशेष भर दिल्याने, फिटनेसच्या बाबतीतही आदित्य इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरला आहे.

आदित्य माने हा मावळ तालुक्याचे माजी तहसीलदार रामभाऊ माने आणि तळेगाव दाभाडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांचा नातू आहे. तसेच दंतवैद्य डॉ. वर्षा माने आणि डॉ. प्रविण माने यांचा तो सुपुत्र आहे. कुटुंबातील शिस्त, शिक्षणाची कास आणि क्रीडेला मिळालेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच आदित्यचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे.

या निवडीमुळे तळेगाव दाभाडे शहरासह संपूर्ण मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून आदित्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासंदर्भात बोलताना आदित्यचे वडील डॉ. प्रविण माने म्हणाले आदित्यने लहानपणापासूनच क्रिकेटसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रशिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आणि त्याची स्वतःची जिद्द यामुळेच हे यश मिळाले. महाराष्ट्राच्या जर्सीत खेळताना तो मावळ तालुक्याचे नाव निश्चितच उज्ज्वल करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!