Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साही प्रारंभ

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साही प्रारंभ

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साही प्रारंभ

तळेगाव दाभाडे : मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेचा जागर घडवणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६ चा उद्घाटन सोहळा तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि साहित्य, कला व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या पंधरवड्याचे उद्घाटन सोमवार, १९ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात करण्यात आले.

या भाषासोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील)होते, तर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. यावेळी नगरसेवक इंदरमल ओसवाल, सत्यम खांडगे, सौ. हेमलताताई खळदे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात मराठीच्या घोषणांनी आणि शब्दोत्सवाच्या उत्साहाने वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना साहित्य, कला व संस्कृती मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. स्नेहलता बाळसराफ यांनी केली. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून सांस्कृतिक ओळखीचा श्वास असल्याचे सांगत समाजातील प्रत्येक स्तरात मराठीचा प्रचार व प्रसार अधिक जोमाने होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा रुजवणे, जपणे आणि समृद्ध करणे ही काळाची गरज असल्याचे ठामपणे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय देत पहिला शब्दकोश निर्माण केला, हा ऐतिहासिक दाखला देत त्यांनी मराठीच्या स्वाभिमानाची आठवण करून दिली. तळेगाव शहरातील कलापिनी, श्रीरंग कलानिकेतन वनश्रीनगर, अखिल भारतीय नाट्यपरिषद यांसारख्या संस्थांच्या कार्याचा गौरव करत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अधिक वाचनालयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमातील प्रमुख वक्त्या सौ. रंजना भोसले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात संस्कृतमधून मराठी भाषेचा झालेला विकास उलगडून दाखवला. इंग्रजी वा अन्य भाषा येत नाहीत हा न्यूनगंड बाजूला ठेवून आत्मविश्वासाने मराठीतून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाषा ही भावनांची वाहक शक्ती असून विरामचिन्हांमुळे वाक्याचा अर्थ कसा बदलतो, हे त्यांनी नेमक्या उदाहरणांतून स्पष्ट केले.

समारोप करताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील)यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील विविध उपक्रमांत नव-निर्वाचित नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. हा कार्यक्रम मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर व उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. शिक्षण विभाग अधिकारी श्रीमती अनिता वैद्य यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरपरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वसुंधरा शितोळे यांनी केले.

मराठीच्या शब्दसंपदेचा जागर घडवणाऱ्या या पंधरवड्याने तळेगाव दाभाडे शहरात भाषाभिमानाची नवी पहाट घडवली, असेच चित्र या उद्घाटन समारंभातून दिसून आले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!