Homeमहत्त्वाचेतळेगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली

तळेगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली

तळेगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली

तळेगाव दाभाडे : येथील सुशीला मंगल कार्यालयात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार दिनांक १९जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५: वाजता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व गणेश मंडळांना डीजेचा वापर पूर्णत : टाळण्याचे आवाहन केले.

डीजेचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला तसेच गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्याचीही आवाहन करण्यात आले. गणेश मूर्ती. निर्माल्य नदीमध्ये अथवा तलावामध्ये टाकू नये. क्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जन करू नये. यावेळी माजी नगराध्यक्षा मीरा फल्ले, माजी नगरसेवक अरुण बबनराव माने, माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम, श्रीकांत मेढी, तळेगाव गोल्डन रोटरी चे उपाध्यक्ष प्रशांत रामचंद्र ताये, आदीनी गणेशोत्सवात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय मांडले.

या बैठकीस पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे प्रवीण कांबळे, माजी उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक भरत वारे, दत्तात्रेय बनसुडे, तळेगावातील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी. सामाजिक कार्यकर्ते. नागरिक. पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!