विजबिल, घरगुती गॅस ग्राहक हक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे निवेदन
तळेगाव दाभाडे : वीज बिलाच्या उशीरा वाटपामुळे विज बिले भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ग्राहकाला नाहक दंडाला सामोरे जावे लागते. याकरिता महावितरणने योग्य वेळेत वीज बिले अदा करावीत अशी मागणी तळेगाव दाभाडे येथील अखिल भारतीय ग्राहक पंच्यातर्फे महावितरण ला करण्यात आली.
दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्याआधी एजन्सीने ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून निश्चितता प्रदान करावी या विषयाचे निवेदन या वेळी देण्यात आले. तसेच तळेगाव दाभाडे येथील विरजी खिमजी एच पी घरगुती गॅस एजन्सी कडे गॅस सिलेंडरच्या संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी ग्राहक मंचाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये गॅस सिलेंडर चेक करून देणे. सिलेंडरचे वजन करणे. सिलेंडर वाहक वाहनाबरोबर वजन काट्याची आवश्यकता याविषयी वीरजी खिमजी गॅस एजन्सी चे संचालक पियुष शहा यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.
शहा यांनी तक्रारीची दखल घेत प्रात्यक्षिकाद्वारे उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या मध्य महाराष्ट्र प्रांत महिला आयाम प्रमुख नयना आभाळे, मावळ तालुका अध्यक्षा कामिनी कडू, मावळ तालुका सचिव सुभाष कडू, तळेगाव शहराध्यक्ष निरंजन जहांगीरदार, महिला शहराध्यक्षा ज्योस्ना वाडेकर, सदस्या वृषाली बनकर, चेतना शहा, नेहा गानू, कालिंदी खोल्लम, दिनेश भारद्वाज, राजेंद्र वझे.आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















