Homeमहत्त्वाचेतळेगावात जुन्या धोकादायक झाडांचा गंभीर प्रश्न माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांनी पालिका...

तळेगावात जुन्या धोकादायक झाडांचा गंभीर प्रश्न माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांनी पालिका प्रशासनाला दिले निवेदन

तळेगावात जुन्या धोकादायक झाडांचा गंभीर प्रश्न माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांनी पालिका प्रशासनाला दिले निवेदन

तळेगाव दाभाडे : शहरातील जुन्या आणि मोठ्या झालेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याकडे तलक्षवेधत तळेगाव दाभाडे शहराचे माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे तातडीने या धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी केली आहे.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा दाखला देत रवींद्रनाथ दाभाडे यांनी नागरिकांच्या सुरक्षततेचा आणि संभाव्य वित्तहानीचा मुद्दा अधोरेखित केला आहे. सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी तळेगाव स्टेशन भागातील नाना भालेराव कॉलनी मध्ये डॉक्टर किरण देशमुख आणि सुनील जैन यांच्या घरावर एक जुने झाड कोसळले होते.

या दुर्घटनेत इमारतीचे व पार्किंग साठी केलेल्या शेडचे मोठे नुकसान झाले असले तरी यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील वाढलेल्या आणि धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथ दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना एक निवेदन सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की तळेगाव स्टेशन परिसरातील सिद्धिविनायक सोसायटी. वतन नगर आणि आनंदनगर परिसरातील १९७० ते १९८० च्या दशकात लावलेल्या निलगिरी आणि अन्य झाडे आता मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडावरील फांद्यांचे वजन वाढल्याने आणि यातील काही झाडे जीर्ण झाल्याने पावसाळ्यात कधीही ती झाडे कोसळू शकतात त्यामुळे मोठी जीवित हानी आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.

तरी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने परिसराची पाहणी करून अत्यंत धोकादायक झालेली झाडे तोडावीत आणि इतर झाडांच्या धोकादायक फांद्या देखील तोडण्याची त्यांनी विनंती केली आहे. भविष्यात या झाडांमुळे अपघात होऊ शकतात तरी पालिका प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे नगरपरिषद प्रशासन कधी आणि कोणती कार्यवाही करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!