Homeसामाजिकतळेगाव दाभाडे नगरपरिषदेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

तळेगाव दाभाडे:आज दि. ३१ ऑक्टोंबर २०२५रोजी राष्ट्रीय एकता दिन आणि राष्ट्रीय संकल्प दिन या दुहेरी स्मरणदिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात देशाच्या दोन महान नेत्यांना अभिवादन करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त एकतेची आणि देशसेवेची शपथ घेतली. देशाच्या अखंडतेसाठी कार्य करणाऱ्या या दोन विभूतींचे योगदान स्मरणात ठेवत वातावरण देशभक्तीने भारून गेले.

या प्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लांडे, लेखा परीक्षक श्रृती सोमवंशी, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, अभियंता अभिषेक शिंदे, राम सरगर, कर संकलन अधिकारी प्रवीण माने, प्रशांत शिवणे, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरुड, अनिल इंगळे, मयूर ढिल्लोड, आशिष दर्शले, प्रवीण शिंदे, प्रशांत गायकवाड, सनी ननावरे, विलास वाघमारे, विशाल लोणारे, एन.यू.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिला वेहळे, रोहित भोसले, पुरुषोत्तम तेजी, आकाश बिडलान, शितल कडूसकर, आदेश गरुड, चंद्रशेखर खंते, समीर भुजबळ, सुरज शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थितांनी एकमुखाने देशाच्या ऐक्य, अखंडतेचा व लोकशाही मूल्यांचा जागर भाव पुढे नेण्याचा संकल्प केला. सरदार पटेल यांच्या एकीच्या विचारांना आणि इंदिरा गांधी यांच्या दृढ नेतृत्वाला अभिवादन करताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत देशभक्तीचा तेजस्वी भाव झळकत होता.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!