Homeसामाजिकतळेगाव-वडगाव जोडरस्ता रखडला; नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा त्रास शिगेला

तळेगाव-वडगाव जोडरस्ता रखडला; नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा त्रास शिगेला

तळेगाव-वडगाव जोडरस्ता रखडला; नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा त्रास शिगेला

तळेगाव दाभाडे : तळेगाव आणि वडगाव या दोन शहरांना जोडणारा महत्वाचा जुना रस्ता आज अक्षरशः मृत्युपाश बनला आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, अरुंद रस्ता आणि नगरपरिषदेच्या बेपर्वाईमुळे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय मान्यतेअभावी ११० मीटर रस्त्याचे रुंदीकरण महिन्यांपासून रखडले आहे. हा रस्ता रुंदीकरणानंतर १५ मीटर होणार असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र प्रशासकीय फाईलीत अडकलेला हा प्रस्ताव नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी पाहतो आहे.

गंगा सोसायटीसमोरील रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. दक्षिण बाजूला खोल खड्डा असल्याने वाहन कोसळण्याची शक्यता कायम असते. अवजड वाहने, डंपर, टँकर यांची सततची ये-जा कोंडी वाढवते. परिणामी वाहनधारकांना रस्त्यावरून मागे घ्यावे लागते, वाद होतात, कधी अपघात तर कधी संतापजनक परिस्थिती निर्माण होते.

दररोज या मार्गाने शेकडो विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी, एमआयडीसीतील कामगार आणि स्थानिक नागरिक प्रवास करतात. मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाटा टाळून एमआयडीसी आणि वडगाव मावळकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक आहे.

वडगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील डांबरीकरण पूर्ण झाले आहे. तळेगाव हद्दीत चाकण रस्त्यापासून आतपर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले. पण फक्त ११० मीटर जोडरस्ता अजूनही ‘मान्यतेच्या प्रतीक्षेत’ आहे. औद्योगिकीकरणामुळे या परिसराचे शहरीकरण झपाट्याने होत असताना मूलभूत सुविधा मात्र रखडलेल्या आहेत.

> “रोजच्या कोंडीत जीव अडकतोय. नगरपरिषद प्रशासन झोपेत आहे का? प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु करावे, नाहीतर नागरिक रस्त्यावर उतरतील!”

दोन शहरांच्या विकासाला जोडणारा हा महत्वाचा दुवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ठप्प झालाय. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणारे हे दुर्लक्ष तातडीने दूर करणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!