Homeसामाजिकतळेगाव दाभाडे येथे कालभैरव जयंती निमित्त ग्रामप्रदक्षिणा, छबिना पालखी सोहळ्यात भाविकांची उत्स्फूर्त...

तळेगाव दाभाडे येथे कालभैरव जयंती निमित्त ग्रामप्रदक्षिणा, छबिना पालखी सोहळ्यात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

तळेगाव दाभाडे येथे कालभैरव जयंती निमित्त ग्रामप्रदक्षिणा, छबिना पालखी सोहळ्यात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

तळेगाव दाभाडे : जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या कालभैरवनाथ जयंतीनिमित्त आयोजित जन्मोत्सव व अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याची सांगता बुधवारी (१२ नोव्हेंबर २०२५) मोठ्या उत्साहात झाली. सायंकाळी श्री डोळसनाथ महाराज मंदिरातून निघालेल्या आकर्षक छबिना पालखी व ग्रामप्रदक्षिणेला मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

सायंकाळी ६.३० वाजता मंदिर परिसरात ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचे मंजुळ नाद, ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात शंखनाद व भजनावेळी भक्त मंत्रमुग्ध झाले. आकर्षक विद्युत रोषणाईच्या छत्र्यांनी सजलेली पालखी मंदिरातून निघताच संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. पारंपरिक वेशातील घोडे, नगाऱ्यांचे निनाद आणि भजनी मंडळांच्या गतिमय तालावर ग्रामप्रदक्षिणा उत्साहात पार पडली.

पालखीचे मानकरी म्हणून भोई समाज, गोंधळी, पुरोहित अतुल रेडे,(गुरुजी)मयुर रेडे(गुरजी) नित्य पुजारी गुरव बंधु तसेच डोळसनाथ मंदिर ट्रस्ट व डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष अविष्कार भेगडे, खजिनदार शुभम लांडे यांसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री डोळसनाथ तालीम मंडळ, महिला मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाविकांच्या उपस्थितीने सोहळ्याचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव अधिक वृद्धिंगत झाले.

प्रदक्षिणेनंतर पालखी मंदिरात दाखल होताच सामूहिक आरती झाली. त्यानंतर भाविकांनी सामूहिक ‘काल्याचा अभंग’ अनुभवला. सोहळ्यानंतर कै. नामदेव रामभाऊ सरोदे स्मृतीप्रित्यर्थ सरोदे परिवारातर्फे महाप्रसाद देण्यात आला. यानंतर जन्मोत्सव व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता विधीवत करण्यात आली.

सप्ताह सोहळा दरम्यान दररोज पहाटे भाविकांच्या हस्ते महापूजा, अभिषेक, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन, कालभैरवाष्टक पठण, दीपप्रज्वलन व कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील दानशूर मान्यवरांच्या मार्गदर्शनाने महाप्रसादाची व्यवस्था सातही दिवस अखंड सुरू होती.

मंदिर परिसरात आकर्षक फुलसजावट, भव्य मंडप व झगमगती विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात आल्याने सोहळा अधिकच देखणा झाला होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मावळ दिंडीसाठी आलेल्या भक्तांना मातोश्री कै. इंदुबाई उत्तम भेगडे व कै. शिवाजी उत्तम भेगडे स्मृतिप्रित्यर्थ कु. सिद्धार्थ भेगडे व परिवारातर्फे महाप्रसाद देण्यात आला.

श्री डोळसनाथ महाराजांच्या भक्तीमय उपस्थितीत संपूर्ण गाव एकजुटीने सहभागी झाल्याने सप्ताह सोहळ्याला अपूर्व अशी धार्मिक रंगत प्राप्त झाली.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!