Homeक्राईमप्रेमसंबंधातून वाढले वैर; सुपारी देऊन तरुणावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद

प्रेमसंबंधातून वाढले वैर; सुपारी देऊन तरुणावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद

प्रेमसंबंधातून वाढले वैर; सुपारी देऊन तरुणावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद

शिरगाव : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैराचे अखेर रौद्ररूप धारण झाले आणि सुपारी देऊन एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात विकास बाळासाहेब केदारी (वय ३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेनंतर फक्त काही तासांत तिघा आरोपींना अटक केली आहे.

शिरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी अभिजित संतोष केदारी (२६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२) आणि आकाश अण्णा भोकसे (२६) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकासचा संशयित अभिजितचा नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होता. हा संबंध अभिजितला मान्य नसल्याने त्याने विकासचा जीव घेण्याचा मनोदय बाळगून कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या कटासाठी अभिजितने नितीन आणि आकाश या दोघांना सुपारी दिली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास विकास ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना नितीन व आकाश यांनी त्याला जबरदस्ती अडवले. वाद घालून वातावरण तापवण्यात आल्यावर नितीनने पिस्तुल काढत थेट विकासच्या मानेवर गोळी झाडली. गोळी आरपार गेल्याने विकास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. हल्ल्याचा आवाज होताच आरोपी तात्काळ पळून गेले.

ग्रामस्थांना आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली असता विकास जीवघेण्या अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवले, त्यामुळे त्याचा जीव वाचल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, फोन लोकेशन आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला गेला. या तपासातून अभिजितला रायगड जिल्ह्यातील माथेरानमधून तर नितीन आणि आकाशला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

तपासात नितीन आणि आकाश हे ‘सराईत’ गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. नितीनवर कामशेत पोलिस ठाण्यात खून आणि शस्त्रप्रकरणी गुन्हे नोंद आहेत. आकाशवर चाकण तिहेरी खूनप्रकरणासह ओशिवरा ठाण्यात शस्त्र प्रक्रणी गुन्हे नोंद आहेत.

या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून वाढणारे वैर किती घातक ठरू शकते, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!