Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या...

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते

तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या वतीने यशवंत नगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 3 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 5 एप्रिल) सकाळी उत्साहात पार पडला. मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे होते. उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती गणेश मोहनराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, इंद्रकुमार ओसवाल, संदीप शेळके, दीपक भेगडे, संतोष भेगडे, सत्यम खांडगे, निखिल भगत यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक निखिल भगत यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची माहिती दिली.

यावेळी बोलताना गणेश काकडे यांनी सांगितले की, या जलशुद्धीकरण केंद्रामुळे स्टेशन परिसरातील रेणो कॉलनी, विद्या विहार कॉलनी, सत्यकमल कॉलनी आणि म्हाडा कॉलनी येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या लवकरात लवकर सोडवून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनीही पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करून शहराचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भाषणात आंद्रा धरणाच्या पाणी आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन वर्षांत नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करून तळेगाव दाभाडे शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाची सांगता नगरसेविका ऋतुजा भगत यांनी आभार प्रदर्शनाने झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!