Homeमहत्त्वाचेवडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा...

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट 

वडगाव मावळ : वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या वडगाव फाटा परिसरात आता संताप उसळू लागला आहे. स्थानिकांच्या जीवावर बेतणाऱ्या या वाहतूक गोंधळावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र वाहतूक शिवसेना आणि शिवसेना मावळ तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर वडगाव पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार काळे यांना निवेदन सादर करण्यात आले. वडगाव फाटा चौकात तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत जड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी निवेदनात ठळकपणे करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील १५ दिवसांत आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा अल्टिमेटमही देण्यात आला आहे.

वडगाव फाटा हा मावळ तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा आणि अपघातप्रवण चौक बनला असून, दररोजच्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले, कामगार आणि प्रवासी यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची गंभीर स्थिती आहे. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुले, भरत भोते, अवधूत चव्हाण, सतीश गरुड, संगीताताई सोनवणे, अनिल ओव्हळ, रमेश जाधव, युवराज सुतार, पोपट राक्षे, संदीप बालघरे, मोरेश्वर घाडगे, रवींद्र गायकवाड आणि पांडुरंग पाटील उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!