Homeमहत्त्वाचेदमदार पावसाने पवना धरण ५४ टक्के भरले

दमदार पावसाने पवना धरण ५४ टक्के भरले

दमदार पावसाने पवना धरण ५४ टक्के भरले

पवनानगर : पवना धरण क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद होत असून, धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढीस लागला आहे. शुक्रवार, दि. २७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पवना धरणाचा साठा ५४.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आगामी काळात पाणीटंचाईची भीती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत पवना परिसरात ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण ७४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे साठ्यात तब्बल ३४.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

तुलनात्मकदृष्ट्या पाहता, गेल्या वर्षी २७ जून २०२४ रोजी धरणाचा साठा केवळ १७.६७ टक्के होता, तर एकूण पावसाची नोंद मात्र तब्बल ३६३६ मि.मी. इतकी झाली होती. यंदा कमी पावसातही साठा अधिक झाल्याने धरणक्षेत्रातील जलसंधारणाचा परिणामकारकपणा अधोरेखित होत आहे.

तळेगाव, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही परिस्थिती दिलासादायक मानली जात आहे. मात्र, आगामी काळात नियमित पाऊस पडणे आवश्यक असून, नागरिकांनी पाण्याचा वापर संयमाने व काटकसरीने करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!