Homeमहत्त्वाचेदेहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या...

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

देहूरोड : देहूरोड छावणी परिषद क्षेत्रातील रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन तसेच विद्युत विषयक कामांबाबत सातत्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. गीतांजली रावत अध्यक्षस्थानी होत्या. नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत आमदार शेळके यांनी प्रशासनाला ठोस आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

आमदार शेळके म्हणाले की, “नागरिकांना भौतिक सोयी-सुविधा तातडीने मिळाल्या पाहिजेत. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी वेळमर्यादा निश्चित करून काम पूर्ण करणे अनिवार्य आहे. लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.”

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी माहिती दिली की, देहूरोड शहरात लवकरच “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एका ठिकाणी सहजपणे मिळणार आहे.

बैठकीस विद्युत विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, महसूल, वन विभाग आदी विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक आप्पा शेलार, प्रवीण झेंडे, रघुवीर शेलार, उमेश नायडू, बाळासाहेब जाधव, तानाजी काळभोर, कृष्णा दाभोळे, किशोर गाथाडे, आशिष बन्सल, नंदू काळोखे, संगिता (नानी) वाघमारे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करून शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा ठोस निर्धार व्यक्त करण्यात आला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!