Homeशिक्षण-प्रशिक्षणधुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; विराज वाघवलेचा ४०१ बैठकांचा नवा...

धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; विराज वाघवलेचा ४०१ बैठकांचा नवा विक्रम

धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; विराज वाघवलेचा ४०१ बैठकांचा नवा विक्रम

वडगाव मावळ (प्रतिनिधी): धुलिवंदनाच्या उत्सवी आणि रंगतदार वातावरणात वडगाव मावळ येथे पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांचा दिमाखदार सोहळा पार पडला. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात आयोजित दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत कुमार व वरिष्ठ गटातील खेळाडूंनी ताकद, जिद्द आणि सहनशक्तीचे विलक्षण प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.

कुमार गटात विराजचा ऐतिहासिक पराक्रम

कुमार गटात विराज अमोल वाघवले यांनी तब्बल ४०१ बैठका मारत नवा विक्रम प्रस्थापित केला. गतवर्षीचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी केलेल्या ३२१ बैठकांचा विक्रम त्यांनी मागे टाकत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला. विराजच्या या दमदार कामगिरीने मैदानात एकच जल्लोष उसळला.

कुमार गटातील अंतिम निकाल:

प्रथम: विराज अमोल वाघवले – ४०१ बैठका

द्वितीय: यश ओझरकर – ५३ बैठका

तृतीय: अंकीत ढोरे – ५१ बैठका

चौथा: आर्यन दौडे – १६ बैठका

वरिष्ठ गटातही चुरशीची लढत

वरिष्ठ गटातील स्पर्धाही तितकीच रंगतदार ठरली. खेळाडूंनी दगडी गोटी उचलून बैठका मारताना शारीरिक ताकद व मानसिक चिकाटीचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

वरिष्ठ गटातील निकाल:

प्रथम: किशोर धोत्रे – १०१ बैठका

द्वितीय: यश प्रवीण चव्हाण – ३६ बैठका

तृतीय: गणेश अंकुश तुमकर – ३१ बैठका

चौथा: आदित्य आगळमे – २२ बैठका

पाचवा: विनीत वहिले – २१ बैठका

आकर्षक बक्षिसांनी गौरव

विजेत्यांना चांदीची गदा, चांदीचे कडे व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. जय बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने दिवंगत पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

प्रायोजकांच्या सहकार्याने विविध गटांतील विजेत्यांना विशेष चषक प्रदान करण्यात आले. वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकासाठी अतुल वायकर, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अरुण वाघमारे यांनी पारितोषिके दिली. कुमार गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे अक्षय बेल्हेकर, विनायक लवगारे व गणेश झरेकर यांनी चषक प्रदान केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, शिवजयंतीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे,  दिनेश ढोरे, अनंता कुडे, विशाल वहिले, शेखर वहिले, मनोज भाऊ ढोरे, शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष कुलदीप ढोरे, गणेश विनोदे, सुनील दंडेल बाळासाहेब तूमकर, संजय दंडेल, सतिश गाडे, अविनाश चव्हाण, क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, राजेंद्र वहिले, सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, सचिन ढोरे, अनिल कोद्रे, राजेंद्र म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धुलिवंदनाच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या मर्दानी खेळांमुळे शिवकालीन परंपरेचे जतन होत असून युवकांमध्ये शौर्य, धैर्य आणि क्रीडाभावनेचा जागर निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धेमुळे वडगाव मावळ परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!