Homeसामाजिकभीमाशंकर येथे ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ संस्थेची रानभाज्यांची सहल

भीमाशंकर येथे ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ संस्थेची रानभाज्यांची सहल

तळेगाव दाभाडे : शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या वतीने रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र भीमाशंकरजवळील खरपुड गावात रानभाज्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

रानभाज्यांचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्व असून पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या भाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे, रानभाज्यांविषयी जनजागृती करणे तसेच आदिवासी भागातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे व शहरी-ग्रामीण महिलांमध्ये नाळ जोडण्याचा प्रयत्न करणे हा या सहलीमागचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेचे महेश महाजन यांनी सांगितले.

सहलीदरम्यान विविध प्रकारच्या रानभाज्या पाहण्याचा व चाखण्याचा अनुभव सर्वांना घेता आला. तसेच आदिवासी भागातील नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या औषधी वनस्पतींबाबत माहिती देण्यात आली. संस्था मागील सहा-सात वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.

रानभाज्यांचे महत्व स्पष्ट करताना विश्वास देशपांडे म्हणाले,

“जुन्या लोकांच्या आहारात नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्यांचा समावेश असल्यामुळे ते निरोगी आयुष्य जगले. आज मात्र बाजारात मिळणाऱ्या भाज्या व फळे केमिकलयुक्त असल्याने अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे अशा रानभाज्यांची योग्य ओळख करून त्यांचा आहारात समावेश होणे गरजेचे आहे.”

या उपक्रमात तळेगाव दाभाडे, निगडी, कोथरूड, पुणे आदी भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सहलीचे नियोजन डॉ. गणेश सोरडे, महेश महाजन, सुधाकर मोरे, ज्ञानेश्वर लष्करी, विश्वास देशपांडे, अमोल गोरे, गणेश भोसले, महेश पाठक तसेच महिला प्रतिनिधी सौ. देशपांडे व सौ. लष्करी यांनी केले.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!