Homeक्राईममनोहरनगर परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

मनोहरनगर परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

मनोहरनगर परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : शहरातील मनोहरनगर परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी प्रभावी कारवाई करत देशी व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी २३ वर्षीय युवकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सवेरा बियर शॉपीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत, मनोहरनगर परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. परिसरात अवैधरित्या दारू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले.

याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाराजे रामराव मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल दिलीप राठोड (वय २३ वर्षे, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे, मूळ रा. कोंदरी, ता. महागाव, जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे देशी व विदेशी दारूचा एकूण २३ हजार ८८० रुपये किमतीचा प्रोव्ही माल आढळून आला असून हा साठा अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी ला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत असून, अवैध दारूविक्रीच्या साखळीचा तपास करून आणखी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे. मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!