Homeसामाजिकतळेगाव दाभाडे नगर परिषदेत अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी

तळेगाव दाभाडे : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांच्या हस्ते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी नगर परिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास कर संकलन लिपिक प्रविण माने, मुकादम पुरुषोत्तम तेजी, प्रकाश मकवाना, आकाश बिडलान, ओंकार माने, नाईक अनिल इंगळे, चालक संतोष दाभाडे यांच्यासह नगर परिषदेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सर्व उपस्थितांनी स्व. वाजपेयी यांच्या कार्याचा व योगदानाचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमप्रसंगी कर संकलन लिपिक प्रविण माने यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात स्व. अटल बिहारी वाजपेयी हे दूरदृष्टी असलेले, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्व देणारे पंतप्रधान होते, असे नमूद केले. देशाच्या विकासासाठी त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली, असेही ते म्हणाले. राजकारणासोबतच साहित्य, कविता आणि भाषणशैलीतून त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले,

स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांनीही स्व. वाजपेयी यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सार्वजनिक सेवेत प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शेवटी उपस्थित सर्वांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

हा कार्यक्रम साध्या पण अर्थपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!