Homeमहत्त्वाचेमाळवाडी ते बेगडेवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था

माळवाडी ते बेगडेवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था

माळवाडी : मावळ तालुक्यातील माळवाडी ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यानचा रस्ता पावसामुळे अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहे त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तळेगाव चाकण महामार्गाला जुना पुणे मुंबई महामार्गाशी जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये जा करत असतात.

तळेगाव स्टेशन, माळवाडी, इंदोरी, शेलारवाडी या गावांसह अन्य नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात. या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यालगतच घोरावाडी रेल्वे स्टेशन तसेच बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. स्थानिक लष्कराच्या मालकीच्या जागेत हा रस्ता असून लष्कराच्या विरोधामुळे या रस्त्याची कामे स्थानिकांना करता येत नाही.

विशेष म्हणजे या मार्गालगतच लष्कराचा ऑर्डनन्स डेपो देखील आहे याच रस्त्याने डेपो मधील सर्व कामगार ये जा करत असतात. या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आमदार खासदार यांच्याबरोबर स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून या रस्त्याचे काम करावे अशी मागणी देखील केली आहे. मागील वर्षी आमदार सुनील शेळके यांनी स्वखर्चातून या मार्गावरील अनेक खड्डे मुरुमाने भरून देखील दिले होते. मात्र या भागातून जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने तसेच जोरदार पावसाने हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.

तरी स्थानिक प्रशासनाने वेळेत दखल घेऊन तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह शेतकरी व कामगार वर्ग तसेच या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

error: Content is protected !!