Homeक्राईममावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची...

मावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाज घेताना रंगेहाथ पकडले

मावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाज घेताना रंगेहाथ पकडले

वडगांव मावळ : मावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाज स्वीकारताना मंगळवारी दि १५ रंगेहाथ पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी पोलीस ठाण्यात हद्दीत ही कारवाई केली अशा गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा मावळ तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार या प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला आहे.

याप्रकरणी मारुती महादेव चोरमले (५३) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती जयेश बाळासाहेब बारमुख (३३, चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना एक कोटी ९० लाख रुपये देऊन त्यांच्याकडून कुसगाव मावळ येथील ३८ गुंठे जमीन विकसन करारनामा करून घेतली आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक स्वाईन यांनी तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्या जागेचे खरेदीखत झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज केला. तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवला.

संबंधित फेरफार मंजूर न होण्यासाठी तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी हरकत घेतली. त्याप्रमाणे मंडल अधिकारी चोरमले याने हरकत अर्जावर सुनावणी सुरु केली. दरम्यान, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी तक्रारदार यांना या प्रकरणाचे अधिकारपत्र दिले. त्यानुसार तक्रारदार हरकतीच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहत होते. नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ३८ गुंठे वादग्रस्त जमीन तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. तसेच त्याचा सहकारी जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. जयेश बारमुख याने मंडल अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपये आणि स्वतःसाठी दहा हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने १४ आणि १५ जुलै रोजी सापळा लावला. १५ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी मधील स्पाईन रोड येथे एका रुग्णालयाच्या समोर आरोपींनी तक्रारदार यांना बोलावले. तिथे मंडल अधिकारी चोरमले याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात तर जयेश बारमुख याने १० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून लाच घेतली. लाच घेत असताना एसीबीने दोघांना रंगेहाथ पकडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!