आदर्श विद्या मंदिर शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
तळेगाव दाभाडे : येथील आदर्श विद्या मंदिर शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम तळेगाव दाभाडे मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्यामंदिर शाळेचा SSC बोर्ड परीक्षा २०२५चा निकाल १०० टक्के लागला आहे. आदर्श विद्या मंदिर शाळेने १०० टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे.
प्रथम क्रमांक कु तन्वी गोविंद जाधव=97.80 टक्के. द्वितीय क्रमांक चि श्रवण सूर्यकांत बेल्हेकर =95.60 टक्के व श्रावणी सुभाष भोसकर=95.60 टक्के, तृतीय क्रमांक कु जान्हवी विलास पाटील=95 टक्क, चतुर्थ क्रमांक कु तेजश्री धोंडीबा घारे=94.80 टक्के, पंचम क्रमांक कु चिन्मयी धोंडीराज लिमये =94.20 टक्के कु तस्किन सय्यद जहांगीर!=94.20 टक्के, यांस बरोबर अन्य १५ विद्यार्थिनी 90% च्या पुढे यश संपादन केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके, उपाध्यक्ष नंदकुमार काळोखे, कान्हु पडवळ, सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव प्राध्यापक वसंत पवार, खजिनदार नंदकुमार शेलार, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष खामकर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे




















