Homeसामाजिकराव कॉलनी विकास प्रतिष्ठान आयोजित – 'खेळ रंगला पैठणीचा' कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त...

राव कॉलनी विकास प्रतिष्ठान आयोजित – ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

राव कॉलनी विकास प्रतिष्ठान आयोजित – ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

तळेगाव दाभाडे : राव कॉलनी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ या विशेष महिला-स्नेही कार्यक्रमाला तळेगाव दाभाडे येथील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैठणी जिंकण्याची संधी यामुळे महिलांचा सहभाग विशेष उठावदार ठरला.

कार्यक्रमात महिलांसाठी लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, फुगडी, वेशभूषा स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा यांसारख्या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत नृत्य, गायन आणि कवितांचे सादरीकरणही रंगले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ती ‘पैठणी स्पर्धा’, जिच्या विजेत्या महिलेला पारंपरिक पैठणी भेट देण्यात आली.

राव कॉलनी विकास प्रतिष्ठानचे संयोजक व नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती डाॅ विशाल सतीशराव वाळुंज यांनी सांगितले की, “महिलांसाठी असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जाणार आहेत, जेणेकरून त्यांचा सशक्त सहभाग समाजकार्यात वाढेल.”

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुखलाल शिंदे, उद्योजक प्रशांत भागवत, संस्थेचे अंकुश भेगडे, युवा नेते आशिष जाधव, आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

बक्षीस वितरण सारिकाताई शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित चव्हाण, विक्रांत वाळुंज, आदित्य निकम, सागर वाळुंज, राहुल कडाळे, ओमकार जोशी, हर्षद चव्हाण.समिर भेगडे. आदींनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी एकमुखाने अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!