Homeताज्या बातम्यावडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले व विद्यार्थी खेळण्यासाठी उद्यानांकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व उद्याने सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज ठेवावीत, अशी मागणी भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सध्या अनेक उद्यानांमध्ये खेळण्यांची साधने जीर्ण अवस्थेत असून काही ठिकाणी ती तुटलेली किंवा बिघडलेली असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून सर्व खेळणी व्यवस्थित स्थितीत ठेवावीत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही, असे कुडे यांनी नमूद केले.

यासोबतच उद्यानांची नियमित स्वच्छता राखणे, परिसरातील झाडांना वेळेवर पाणी देणे आणि हरित वातावरण टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर झाडांचे संगोपन केल्यास नागरिकांना थंडावा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, या सर्व कामांसाठी नगरपंचायतीने स्वतंत्र पथक नेमून नियमित देखरेख करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. उद्यानांची योग्य देखभाल झाल्यास लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!