Homeमहत्त्वाचेवारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला

वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला

वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला

पिंपरी चिंचवड: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी १९जुन २०२५ रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २०जुन २०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली असून पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची तसेच पालखी मार्गाची खोराटे यांनी पाहणी केली.

या पाहणी दौऱ्याच्या वेळी सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कर्मचारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता.उप अभियंता, विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधीत विभागाने घ्यावी. सर्व विभागांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे नियोजन करावे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. पिण्याचे पाणी. तातडीच्या वैद्यकीय सुविधा. स्वागत कक्षाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वारकरी निवास. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात फिरत्या शौचालयाची व्यवस्था करावी आदी निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी दौऱ्या दरम्यान दिले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!