Homeशिक्षण-प्रशिक्षणतळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या...

तळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले

तळेगाव दाभाडे: शहरातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक १३ जुन २०२५ रोजी नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी वेगवेगळ्या शारीरिक शिक्षणाच्या खेळाने तसेच टाळ्यांच्या गजरात गाण्यांच्या तालावर हसतमुखाने मुख्याध्यापिका सोबत सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नाविन्यपूर्ण पद्धतीने डोरेमोन आणि मिकी माऊस हे कार्टून विद्यार्थ्यांचे केंद्रबिंदू ठरले.

बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी रंगून गेले होते. नृत्य. नाटक. कविता याबरोबरच लाठी. काठी. दानपट्टा या मर्दानी खेळाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंटवर व मिकी माऊस डोरेमोन बरोबर विद्यार्थ्यांचे यावेळी फोटो काढण्यात आले.

कार्यक्रमानंतर पालक सभा घेण्यात आली. या पालक सभेत शैक्षणिक वर्षाच्या सर्व आवश्यक बाबी त्यांना सांगण्यात आल्या तसेच यावेळी शाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रम व अन्य गोष्टींची पालकांना ओळख करून देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन हेमा कोळेकर व नेहा घुले या सहशिक्षकांनी केले. या वेळी अनेक लहान विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!