Homeसामाजिकशाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी मानले आमदार सुनील शेळके यांचे...

शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी मानले आमदार सुनील शेळके यांचे आभार

शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी मानले आमदार सुनील शेळके यांचे आभार

तळेगाव दाभाडे: शहरातील अॅड पुरुषोत्तम वासुदेव परांजपे(पु.वा. परांजपे) शाळेच्या अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले या रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनील शेळके त्यांनी दिलेल्या विकास निधीतून सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाले.

अॅड. पु. वा. परांजपे शाळा प्रशासनाकडून शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, संपत गाडे, तसेच शाळेचे सन १९९५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी संजय बाविस्कर, अमोल बुडखले, अनिरुद्ध जोशी, निलेश कोतुळकर, हेमंत घोडेकर, मिलिंद ठावगे, नितीन खोल्लम, प्रशांत गुमल, सचिन हेंद्रे, कमलेश होनावळे, या माजी विद्यार्थ्यांनी आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना औपचारिक आभार पत्र देऊन त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी आमदार शेळके यांचे आभार मानताना सांगितले की रस्ता दुरुस्ती मुळे विद्यार्थ्यांचे शाळेत येणे जाणे सुखकर झाले आहे. याप्रसंगी आभार स्वीकारताना आमदार सुनील शेळके म्हणाले की विद्यार्थी व शिक्षण संस्थांच्या विकास यांना माझ्या विकास कामांमध्ये विशेष प्राधान्य दिले जाते.

भविष्यात शाळेसाठी कोणत्याही स्वरूपाची मदत लागलीस मी निश्चितपणे सहकार्य करीन असे देखील आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. तसेच गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल आणि संस्थाचालक शिक्षण संस्था ग्रामीण यांच्यावतीने आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेची शिस्त. गुणवत्ता. विद्यार्थी संख्येत झालेली वाढ. शाळेत झालेल्या सर्व भौतिक सुधारणा बाबत आमदार सुनील शेळके त्यांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या पुढील विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!