Homeसामाजिकश्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ११ टक्के लाभांश जाहीर

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ११ टक्के लाभांश जाहीर

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ११ टक्के लाभांश जाहीर

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी योगीराज मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. यावर्षी संस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे (अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), रेशमाताई भोसले (अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन), भास्करराव म्हाळसकर (संस्थापक अध्यक्ष शिवजयंती उत्सव मावळ/मावळ विचार मंच), जनार्दन रणदिवे (चेअरमन, पुणे पिपल्स सहकारी बँक), रेवणनाथ दारवटकर (संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), बबनराव भोंगाडे (माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती) तसेच अंकुश आंबेकर (चेअरमन, खादी ग्रामउद्योग) उपस्थित होते.

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी संस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त करताना, “आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीही साध्य होऊ शकते” असे प्रतिपादन केले.

रेशमाताई भोसले यांनी महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची स्तुती केली. तर भास्करराव म्हाळसकर व जनार्दन रणदिवे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

संस्थेच्या सभासदांसाठी सुरु केलेल्या महिला सन्मान ठेव योजना तसेच इतर योजनांची माहिती संतोष भेगडे (सचिव, पुणे जिल्हा नागरी सह पतसंस्था फेडरेशन) यांनी दिली.

संस्थेचे मुख्य कार्यालय अद्ययावत डिझाईन करून दिल्याबद्दल आर्किटेक्ट प्रियांका भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेली २५ वर्षे संस्थेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापिका तस्लीम शिकीलकर आणि श्री समर्थकृपा महिला बचत गट यांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक – अध्यक्ष शरद भोंगाडे, अहवाल वाचन – संचालक राहुल पारगे, सूत्रसंचालन – सचिव अतुल राऊत, आभार प्रदर्शन – संचालक शंकर भेगडे

या प्रसंगी खजिनदार अमित भसे, उपाध्यक्ष समीर भेगडे, संचालक आशिष खांडगे, अरविंद गद्रे, विजय भेगडे, प्रविण मुर्हे, सल्लागार चंद्रजीत वाघमारे, महेशभाई शहा, शाळीग्राम भंडारी, संजय ओसवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भोमे, माजी अध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगरसेवक रामभाऊ गवारे यांच्यासह नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या शेवटी संस्थेचे संचालक मंडळ व सभासदांनी एकमताने संस्थेच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेतले. ११% लाभांशामुळे सभासदांत समाधानाचे वातावरण असून, संस्थेने सभासदाभिमुखतेचा उत्तम आदर्श प्रस्थापित केल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!