Homeमहत्त्वाचेटाकवे येथे आढळला दुर्मिळ बॉम्बे सॅसीलियन प्राणी

टाकवे येथे आढळला दुर्मिळ बॉम्बे सॅसीलियन प्राणी

टाकवे येथे आढळला दुर्मिळ बॉम्बे सॅसीलियन प्राणी

मावळ तालुक्यातील टाकवे गावात दुर्मिळ उभयचर प्राणी बॉम्बे सॅसीलियन (Bombay Caecilian – Limbless Amphibian) आढळून आला असून, स्थानिक पर्यावरणप्रेमी व वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेमुळे त्याचा यशस्वी बचाव करण्यात आला.

गावातील एका बांधकामस्थळाजवळ पाण्याच्या टाकीत साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर, शिवदुर्ग मित्र टीम व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहिदास कालेकर व जिगर सोलंकी घटनास्थळी पोहोचले. तपासणी केली असता तो साप नसून दुर्मिळ बॉम्बे सॅसीलियन असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासणीत प्राण्याला कोणतीही दुखापत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पकडून मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

प्राण्याची वैशिष्ट्ये

सॅसीलियन हा पायविरहित उभयचर प्राणी आहे.

शरीर लवचिक व मऊसर असते.

तो जमिनीखालील ओलसर व अंधाऱ्या जागेत राहतो.

कीटक व लहान जीव खाऊन पर्यावरणातील संतुलन राखतो.

पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती असून त्याचे दर्शन अत्यंत क्वचित घडते.

पर्यावरणशास्त्रज्ञ सागर महाजन यांनी सांगितले की, “सॅसीलियन हा अतिदुर्मिळ, संवेदनशील आणि परिसंस्थेसाठी महत्त्वाचा प्राणी आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे.

स्थानिक पर्यावरण रक्षकांच्या तत्परतेमुळे हा दुर्मिळ प्राणी सुरक्षितपणे निसर्गात परतला असून, यामुळे मावळ परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे, मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!