सामाजिक सहयोग उपक्रम संस्था(CAP) यांच्या वतीने मावळ तालुक्यातील ५ जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप
तळेगाव दाभाडे: सामाजिक सहयोग उपक्रम संस्था( CAP) यांच्या वतीने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा करंजगाव. साबळेवाडी. ठाकूरवाडी.उकसाण. गोवित्री या शाळेतील मुलांना एकूण १७ हजार वह्या वाटप करण्यात आल्या.CAP या संस्थेचा हा उपक्रम दरवर्षी तालुक्यातील विविध शाळेत राबविला जातो.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर संस्थेचे ज्येष्ठ व तरुण सदस्य शाळेत जाऊन मुलांना वह्या वाटप करतात. हा उपक्रम CAP संस्था गेल्या ५ वर्षापासून राबवत आहे. तसेच वेळोवेळी गरीब गरजू मुलांना फराळ वाटप. कपडे वाटप. वीट भट्टी वरील मुलांना बूट .चपला. थंडीत गरम कपडे वाटप. प्रौढ साक्षरता कार्यक्रम. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे. वृक्षारोपण. पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आदी सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते.
वह्या वाटप कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ व तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पाच बसेसने वरील सर्व शाळेत पोचल्या होत्या.CAP संस्थेच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. करंजगाव. साबळेवाडी. ठाकूरवाडी. उकसान. गोवित्री या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संस्थेचे मनापासून आभार मानले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















