तळेगाव येथील मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ अध्यक्षपदी भास्कर पुंडले तर उपाध्यक्ष पदी डॉ नेहा कुलकर्णी
तळेगाव दाभाडे : मराठी भाषेत साहित्य आणि संस्कृतीचा विकास आणि उत्कर्षासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवणारी संस्था मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षपदी भास्कर पूंडले, उपाध्यक्षपदी डॉ नेहा कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. कार्याध्यक्ष म्हणून मंगेश राजहंस, सचिव अर्चना मुरूगकर, खजिनदार रश्मी थोरात, निरीक्षक मोहनराव जाधव यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्य विश्वस्त सुरेशराव साखवळकर होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष प्राध्यापक जयंत जोर्वेकर, उपाध्यक्ष डॉ नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश चंद्रात्रेय, कार्याध्यक्ष श्री कृष्ण मुळे( गुरुजी) नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर पुंडले, कोषाध्यक्ष माधवी खडक्कर, हे उपस्थित होते.
प्राध्यापक जयंत जोर्वेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष माधवी खडक्कर यांनी सन २०२४-२५ चे हिशोब वितरण पत्रक सभेसमोर सादर केले. त्या हिशोबास संस्थेने मान्यता दिली. त्यानंतर नियमानुसार विश्वस्त सुरेशराव साखवळकर यांनी मागील वर्षाची कार्यकारणी कार्यकाल विसर्जनाच्या ठराव मांडला त्यांना प्राध्यापक जयंत जोर्वेकर यांनी अनुमोदन दिले.
मुख्य विश्वस्त सुरेशराव साखवळकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेने त्यांचा सत्कार केला. आपल्या मनोगतात साखवळकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीचे अभिनंदन केले. प्रा जयंत जोर्वेकर मावळते अध्यक्ष यांनी संस्थेला सुप्रतिष्ठित केले आहे.
मजबूत आर्थिक बाजू करून दिली आहे. यापुढे संस्थेने अशीच प्रगती करावी असे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर पुंडले त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. सुप्रिया पुंडले आणि मुग्धा जोर्वेकर यांनी ईशस्तवन म्हटले तसेच श्रीकृष्ण मुळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे. सुरेशराव साखवळकर मुख्य विश्वस्त, राजन लाखे विश्वस्त, प्रभाकर ओव्हाळ, = विश्वस्त. कैवल्य उर्फ आशिष पाठक विश्वस्त, कार्यकारणी सदस्य प्रा जयंत जोर्वेकर, मुग्धा जोर्वेकर, श्रीकृष्ण मुळे, विनया केसकर, डाॅ राजेंद्र कुलकर्णी, कुसुमाकर दामले, माधवी खडक्कर, सुप्रिया पुंडले, अभिजीत काळे, सीमा जोशी, कल्पना गाडे, अरुंधती देशपांडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पुंडले यांनी केले तर आभार अर्चना मुरूगकर यांनी मानले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















