स्माईल सायक्लोथाॅन रॅली उत्साहात संपन्न झाली
तळेगाव दाभाडे : २६ जून’ जागतिक अंमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त (दि. २८) जून रोजी ‘स्माईल सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे ,अंमली पदार्थ विरोधी पथकाचे व.पो.नि संतोष पाटील, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो.संतोष शांताराम परदेशी, उपाध्यक्ष रो. प्रशांत रामचंद्र ताये, सचिव रो. प्रदीप टेकवडे, ऍसीसटंट गव्हर्नर रो. दिपक फल्ले, क्लब ऍडमीन, रो. बसप्पा भंडारी, टेक्नोवेसचे संचालक निखिल महापात्रा स्माईलचे संस्थापक हर्षल पंडित, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आयर्न मॅन कझखस्थान धनराज हेळांबे, युथ आयकॉन API राम गोमारे, युथ आयकॉन सुरज जाट उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन विशाल हिरे व संतोष परदेशी यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झाले. विविध घोषणा देत स्माईल सायक्लोथॉनची सकाळी ०६.३० वा. सुरूवात झाली. NDRF, CRPF तसेच CRPF बटालियन २४२ चे जवान, विविध सायकल क्लबचे सायकल स्वार, पोलिस बांधव व नागरिक असे साडेचारशे पेक्षा जास्त सायकल स्वार सहभागी झाले होते.
‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ तसेच व्यसनांच्या विरोधात विविध घोषणा देत स्माईल व्यसनमुक्ती केंद्र,उर्से येथे या रॅलीची सांगता झाली.पूर्ण मार्गावर पाणी व थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती.
समारोप कार्यक्रमाची सायकल स्वारांच्या व मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात झाली. स्माईल चे संस्थापक हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, व.पो.नि. संतोष पाटील, शिरगाव परंदवाडी पो.स्टे. चे व.पो.नि. विशाल पाटील, सि.आर.पी.एफ चे झा. सारस्वत मॅडम अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक सायकल स्वारास मेडल,टी शर्ट, प्रशस्तीपत्र, नाष्टा व शीत पेय देण्यात आले. साठे काका, व अतुल शेटे या मान्यवरांचा सत्कार पुणेरी पगडी, तुळशीचे रोप, व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. प्रशांत ताये यांनी उत्स्फूर्त शैलीत केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्माईलचे राहुल बोरुडे, रोहन यादव, नितिन नाटेकर, हर्षल जोशी, राहुल केळकर, जयंत खेर्डेकर, आनंद भागवत, स्माईलचे कार्यकर्ते अजिंक्य देशपांडे, अक्षय सांडीम, अमेय कुलकर्णी, गणेश गुंडरे, राजेंद्र ढूस, निलेश साळूंके, प्रशांत टोणगे यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्श दिपक फल्ले यांनी केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















