स्वर्गीय किशोरभाऊ आवारे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
तळेगाव दाभाडे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक. अनेक गोरगरिबांना निस्वार्थपणे मदत करणारे जनसेवक. स्वर्गीय किशोर गंगाराम आवारे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी शनिवार दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२: वाजता जुना पुणे मुंबई महामार्गाच्या लगत सोमाटणे फाटा जवळील दि एमराल्ड रिसॉर्ट या ठिकाणी होणार आहे.
किशोर आवारे यांची कन्या कु. प्रियंका किशोर आवारे यांच्या हस्ते पुर्णाकृती स्मारकाचे अनावरण होईल. याच ठिकाणी महिला भगिनींसाठी राखी पौर्णिमा सणाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महिला भगिनींनी राखी घेऊन कार्यक्रमास यावे. तसेच सर्व हितचिंतक. नातेवाईक. महिला भगिनी. किशोरभाऊ आवारे मित्र परिवार यांनी आपल्या कुटुंबासहित कार्यक्रमास यावे अशी विनंती जनसेवक किशोरभाऊ आवारे फाउंडेशन यांनी केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















