Homeसामाजिकस्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध

वडगाव मावळ : येथील स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील ७ जोडपी विवाहबद्ध झाली. वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात हा सोहळा पार पडला.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली. साखरपुडा सोहळ्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना व जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पल्लवी दाभाडे, सभापती सुनीता येवले, नगराध्यक्षा अबोली ढोरे, सुनीता कुडे, दिलीप ढोरे, राजेंद्र कडलक, प्राची गायकवाड, रेश्मा देवकर, सुनीता केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर वधू-वरांचा हळदी समारंभ, वऱ्हाडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली. या निमित्ताने जनरल हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात पदाधिकारी, वऱ्हाडी मंडळी तसेच ट्रेडिंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सायंकाळी हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत मुख्य विवाह सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळके व भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, उपसभापती साहेबराव कारके, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, बाजार समिती सभापती सुभाषराव जाधव, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, पोटोबा महाराज देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी अन्नदान केल्याबद्दल संचालक संजय दंडेल व रेणुका दंडेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वागत सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांनी केले, प्रास्ताविक पंढरीनाथ ढोरे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव गणेश विनोदे यांनी केले. आभार अतुल राऊत यांनी मानले.

या सोहळ्याचे यशस्वी आयोजन कार्याध्यक्ष खंडुजी काकडे, कार्यक्रमप्रमुख संभाजी येळवंडे, उपाध्यक्ष सुधीर ढोरे, सचिव कार्तिक यादव, खजिनदार अक्षय बेल्हेकर गणेश झरेकर, केदार बवरे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, विलास दंडेल, रोहिदास गराडे, अजय धडवले, अरुण वाघमारे, काशिनाथ भालेराव, विवेक गुरव, अविनाश कुडे, सुनील शिंदे, सोमनाथ धोंगडे, शंकर ढोरे, महेश तुमकर, नंदकुमार ढोरे, बाळासाहेब तुमकर, विनय लवंगारे, प्रवीण कुडे, अनिकेत भगत, गणेश ढोरे, सुहास विनोदे, ओंकार तुमकर, सतीश गाडे, उमेश ढोरे, मंगेश तुमकर, शिवाजी येळवंडे, जितेंद्र ढोरे, महेश ढोरे, अर्पण ढोरे तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.

सोहळ्याची वैशिष्ट्ये :

रक्तदान शिबिराचे आयोजन

वऱ्हाडी मंडळींसाठी बैठक व भोजन व्यवस्था

नवरदेवांची भव्य मिरवणूक

वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ व आकर्षक भेटवस्तू

वधूंना चांदीचे अलंकार प्रदान

या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून, समाजात एकोप्याचा व सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!