Homeमहत्त्वाचेवडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क...

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांबाबत पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस निरीक्षक शंकर मनोहर पाटील यांनी यासंदर्भात जाहीर आवाहन करत संबंधित वाहनांच्या मूळ मालकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस स्टेशनच्या परिसरात विविध प्रकारची वाहने दीर्घकाळापासून बेवारस स्थितीत पडून असून, ती “मुद्देमाल निर्गती मोहिम” अंतर्गत विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वाहन मालकांनी आपली वाहने ओळख पटवून घेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आवाहनानुसार, संबंधित वाहनांच्या मालकांनी आपल्या वाहनाची खात्री करून मूळ आर.सी. बुक व आधारकार्डसह ही प्रेस नोट प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक शंकर मनोहर पाटील (मो. ९०११०७९६२२) किंवा मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार संदीप वंडाळे (मो. ९५९५५०६०१५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निर्धारित कालावधीत संबंधित वाहन मालकांनी संपर्क साधला नाही, तर संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचा लिलाव करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनांचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असून, नागरिकांनी याकडे गांभीर्यानेलक्ष देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!