Homeक्राईमहॉटेल साईराजच्या आडोशाला विदेशी दारू साठवणारा युवक तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

हॉटेल साईराजच्या आडोशाला विदेशी दारू साठवणारा युवक तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

हॉटेल साईराजच्या आडोशाला विदेशी दारू साठवणारा युवक तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

माळवाडी (तळेगाव दाभाडे) : तळेगाव–चाकण रोडवरील हॉटेल साईराजच्या मागील बाजूस बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा करून तिची वाहतूक करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. बुधवार, 10 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास माळवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस शिपाई रमेश सोमिनाथ घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सार्थक सतीश दाभाडे (वय 20, रा. कोटेश्वर वाडी, मावळ) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांना त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा मिळून आला.

जप्त करण्यात आलेल्या दारूचा तपशील पुढीलप्रमाणे :ओल्ड मॉंक – ६ बाटल्या, डिलक्स – ४ बाटल्या, किंगफिशर स्ट्रॉंग – ८ बाटल्या, बडवायजर मॅग्रम – ४ बाटल्या, बडवायजर प्रीमियम – २ बाटल्या, क्लासिक बर्ग – ७ बाटल्या, ट्युबर्ग – १६ बाटल्या

एकूण ₹10,515 किमतीचा प्रोहिबिशन माल पोलिसांनी जप्त करून पंचनामा करण्यात आला. परिसरात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली दिसत असल्याने पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनायकुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस आयुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, वसीम शेख, पोलीस शिपाई भीमराव खिलारे, गणेश दरदंले व फिर्यादी रमेश घुले यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू वाहतुकीला मोठा आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिनिथी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!