
इंदोरीत पोलिसांची धडक कारवाई; 28 हजारांचा गांजा जप्त
इंदोरी(मावळ)जांबवडे रोड, इंदोरी परिसरात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या अचूक कारवाईत 28,784 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सलीम हुसेन मुजावर (वय 63, रा. साईनगर, इंदोरी – भाडेकरू) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 286/2025, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त)(अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6.50 वाजता तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास पथकाला आरोपीकडे बेकायदेशीररीत्या गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने जांबवडे रोडवरील साहेबराव काशीद यांच्या चाळीजवळ सापळा रचून धाड टाकली. कारवाई दरम्यान आरोपी सलीम मुजावर याच्या ताब्यातून 544.68 ग्रॅम गांजा (किंमत 27,234 रुपये) तसेच 1,550 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 28,784 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


गांजा कोठून आणला याबाबत आरोपीकडून चौकशी करण्यात आली; मात्र त्याने कोणतीही माहिती न देता चौकशीस सहकार्य केले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोआ शशीकांत महावरकर, अप्पर पो.आयुक्त सारंग आवाड, पोउप आयुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पो.आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउपनिरीक्षक दिपक खरात, पोहवा अनंत रावण, वसीम शेख, पोशि. विनायक शेरमाळे, भिमराव खिलारे, गणेश दरदळे आणि रमेश घुले यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.=मो९९२१८०७०११




















