Homeमहत्त्वाचेअकोला जिल्ह्यातील अपूर्ण कामांवर आमदार सुनील शेळके यांचा थेट आढावा; दोषींवर कारवाईचे...

अकोला जिल्ह्यातील अपूर्ण कामांवर आमदार सुनील शेळके यांचा थेट आढावा; दोषींवर कारवाईचे आदेश

अकोला जिल्ह्यातील अपूर्ण कामांवर आमदार सुनील शेळके यांचा थेट आढावा; दोषींवर कारवाईचे आदेश

मुंबई : विधानभवनात आज झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्ह्यातील अपूर्ण प्रलंबित कामांवर सखोल चर्चा झाली. समितीच्या अकोला जिल्ह्याच्या (११ ते १३ ऑक्टोबर २०२१) झालेल्या दौऱ्यात दिलेल्या आश्वासनांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सन २००७ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरींच्या अनेक कामा अद्याप अपूर्ण असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्त्वाच्या या प्रकल्पांमध्ये झालेली ही ढिलाई थेट शेतकऱ्यांच्या हिताला बाधक ठरत असल्याची बाब आमदार शेळके यांनी अधोरेखित केली.

सामाजिक वनीकरण विभागात २०१९ पासून रोपवाटीका उभारण्यात आलेली नाही, असे गंभीर वास्तव बैठकीत समोर आले. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या कामांचे महत्त्व अधोरेखित करत शेळके यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.

रेशीम विभागात २०१८ ते २०२२ दरम्यान मंजूर झालेली अनेक कामे तीन वर्षांनंतरही अपूर्ण आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या योजनांकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल आमदार शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २५६ घरकुलांची कामे पूर्ण असूनही लाभार्थ्यांचे हप्ते वितरित झालेले नाहीत, हे धक्कादायक वास्तव बैठकीत उघड झाले. घरकुलधारकांना तातडीने थकित रकमेचे हप्ते मिळावेत, यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

२०१६ ते २०२२ दरम्यान मंजूर झालेली अनेक रस्ते व शेतरस्त्यांची कामे अजूनही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. विशेषत: शेतरस्त्यांमध्ये झालेल्या अनियमिततेवर चौकशी पूर्ण झाली असली तरी पुढील कारवाई अद्याप झाली नसल्याचे उघड झाले.

बैठकीदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना ठोस शब्दांत संदेश दिला की –

> “शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हिताशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित ठेवले जाणार नाही. शेतकरी राजा हा कोणत्याही योजनेतून वंचित राहणार नाही. योजनांचे लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळाले पाहिजेत, हेच सरकारचे प्राधान्य असले पाहिजे.”

तसेच, दोषींवर विभागीय चौकशी करून आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी सचिवांना दिल्या.

या बैठकीस आमदार सुरेश खाडे, अमोल जावळे, राजेश वानखेडे, काशिनाथ दाते, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक, बापुसाहेब पठारे, किशोर दराडे, तसेच प्रधान सचिव, कृषि प्रधान सचिव, ग्रामविकास सचिव, नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अकोला जिल्हा परिषदेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!