Homeसामाजिकअमली पदार्थ विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी क्लबचा विशेष...

अमली पदार्थ विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी क्लबचा विशेष सन्मान

अमली पदार्थ विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी क्लबचा विशेष सन्मान

तळेगाव दाभाडे : समाजामध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या वापराविरोधात लढा उभारण्याच्या उद्देशाने भोई प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने “अमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव” हा उपक्रम लेडी रमाबाई हॉल, एस. पी. कॉलेज रोड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची दखल घेत खासदार मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते क्लबचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार मेघा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात गोल्डन रोटरी क्लबने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “आजची तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. गोल्डन रोटरी क्लबने जनजागृतीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून, असे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे.”

गोल्डन रोटरी क्लबने मागील महिन्यात “अमली पदार्थ आणि आजची तरुणाई” या विषयावर इंद्रायणी महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या या प्रयत्नाची दखल घेऊनच भोई प्रतिष्ठानने क्लबला सन्मानित केले.

या सोहळ्यास महाराष्ट्र शासनाच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे महानिरीक्षक प्रवीण पाटील, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबला वादक व संगीतकार शिवमणी शंकर, डॉ. मिलिंद भोई आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहिले.

तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी व सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी हा विशेष सन्मान स्वीकारला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अमली पदार्थ विरोधातील जनजागृती ही फक्त मोहिम न राहता ती सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी क्लब सातत्याने प्रयत्नशील राहील.”

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!