Homeसामाजिकआंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे बिनविरोध

आंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे बिनविरोध

आंबळे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास शेटे बिनविरोध

वडगाव मावळ : आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच रामदास (बाळा) यशवंत शेटे यांची बिनविरोध निवड झाली. रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड प्रक्रिया शांत वातावरणात पार पडली.

मावळते अध्यक्ष बाबाजी वायकर यांनी आपल्या राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. सहाय्यक निबंधक कार्यालयात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्षपदासाठी रामदास शेटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेश निखारे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी संचालक सिताराम आंभोरे, बंडू कदम, मोहन घोलप, बंडू घोजगे, बाबाजी वायकर, पांडुरंग शेटे, विलास भालेराव, सिंधूबाई शेटे, सुलाबाई कदम आणि मंगेश चतुर उपस्थित होते.

निवड जाहीर झाल्यानंतर रामदास शेटे यांनी ग्रामदैवत पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पोटोबा महाराज मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीचे सदस्य गोविंदराव आंभोरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, युवा नेते देवा गायकवाड, रोहीदास मराठे तसेच पोलीस पाटील शंकरराव आंभोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

सरपंच राजेश कोकाटे, यशवंत शेटे, श्रीकांत मोढवे, पांडुरंग मोढवे, नवनाथ मोढवे, संदीप मोढवे, तेजस मोढवे, अनिल बाबर, अरविंद बधाले, मयूर नरवडे, जयेश शेटे, स्वप्नील शेटे, प्रविण बधाले, अक्षय शेटे, पांडुरंग शेटे, मारुती शेलार, भरत आंभोरे, जगन हांडे, संदीप हांडे, सीताराम आंभोरे, चंद्रकांत घोलप, गोरख घोलप, जयेश शेटे आणि प्रल्हाद शेटे, विक्रम हेमाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन घोलप यांनी केले. नवनाथ मोढवे यांनी सूत्रसंचालन केले, तर हनुमंत हांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

रामदास शेटे यांच्या बिनविरोध निवडीमुळे आंबळे परिसरातील सहकार चळवळीत नवी पिढी पुढे येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास शेटे म्हणाले,

“आंबळे पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने मला संधी दिली आहे. हा विश्वास जपत सहकार क्षेत्रात पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा प्रयत्न राहील. आमदार सुनिल शेळके, सहकारमहर्षी माऊली दाभाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!