Homeसामाजिकआमची गौराई… आमचा अभिमान! प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती...

आमची गौराई… आमचा अभिमान! प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्साहाचा माहोल

आमची गौराई… आमचा अभिमान!

प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्साहाचा माहोल

इंदोरी : गणेशोत्सव आणि गौरीपूजनाच्या पारंपरिक सणाला सर्जनशीलतेची आणि उत्साहाची नवी झळाळी देण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने “आमची गौराई… आमचा अभिमान!” या घोषवाक्याखाली घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गावोगावी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Oplus_16908288

आकर्षक बक्षिसांची मेजवानी

या स्पर्धेत विजेत्यांसाठी खास व आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे.

प्रथम क्रमांक – फ्रिज

द्वितीय क्रमांक – पिठाची गिरणी

तृतीय क्रमांक – वॉशिंग मशीन

चतुर्थ क्रमांक – फूड प्रोसेसर

पाचवा क्रमांक – स्मार्टफोन

तसेच गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री अशी प्रोत्साहनपर बक्षिसेदेखील ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी

1. स्पर्धा केवळ इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील गावांपुरती मर्यादित असेल.

2. स्पर्धा कालावधी – १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२५.

3. सहभागासाठी स्पर्धकांनी QR कोड स्कॅन करून किंवा 9090991020 या क्रमांकावर आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच सजावटीचे फोटो/व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे.

4. फोटो व व्हिडिओ Facebook व Instagram वर अपलोड करून Prashant Bhagwat (prashantbhagwatofficial) या अधिकृत पेजला टॅग करणे बंधनकारक आहे.

5. स्पर्धेचा निकाल ७ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. ऑनलाइन पद्धतीने फेसबुक व इंस्टाग्रामवर जाहीर केला जाईल.

6. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

सहभागी होऊ शकणारी गावे

या स्पर्धेत माळवाडी, तळेगाव (ग्रा.), नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिढेवाडी, सुदवडी, सुदुंबरे, आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी, राजपुरी, सांगवी, नानोली, वराळे, मोहितेवाडी, साते, बाम्हणवाडी, जांभुळ, इंदोरी, जांबवडे या गावांतील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे.

प्रशांतदादा भागवत यांचे आवाहन

या उपक्रमाविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांतदादा भागवत म्हणाले – “गणेशोत्सव हा एकतेचा, श्रद्धेचा आणि सर्जनशीलतेचा सण आहे. या स्पर्धेतून घराघरातील कौशल्य आणि भक्तिभाव उभा राहील. गावोगावील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, हीच अपेक्षा आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!