Homeमहत्त्वाचेआमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत TDIA बैठकीत उद्योगनगरीच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत TDIA बैठकीत उद्योगनगरीच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय वाहतूक, रस्ते, वीज व कामगार सुविधा या विषयांवर ठोस चर्चा

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत TDIA बैठकीत उद्योगनगरीच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय वाहतूक, रस्ते, वीज व कामगार सुविधा या विषयांवर ठोस चर्चा

तळेगाव दाभाडे :– मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन (TDIA) ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस TDIA अध्यक्षा श्रीमती अनु सेठी, उपाध्यक्ष श्री. जगदीश यादव, तसेच तळेगाव MIDC पोलिस निरीक्षक श्री. रणजित जाधव यांच्यासह नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस पावले उचलण्यात आली तळेगाव MIDC परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. यासाठी ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, ह्युंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण तसेच इतर प्रलंबित रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या . चाकण–शिंदे वासुली व शिंदे वासुली–पॉवर हाऊस मार्गावरील प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी थेट सूचना दिल्या. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे वासुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे MIDC भागात काम करणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MIDC मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत आमदार सुनील शेळके यांनी ठोस भूमिका घेतली. “उद्योगांच्या प्रगतीसाठी सततचा वीज पुरवठा आवश्यक आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे ते यावेळी स्पष्टपणे म्हणाले.

बैठकीस उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या CSR फंडातून मावळ तालुक्यातील सामाजिक व विकासकामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार शेळके यांनी CSR फंडातील रक्कम स्थानिक विकासासाठी वापरण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला.

या बैठकीस एफ.ई.व्ही इंडिया, एलअँडटी डिफेन्स, इमर्सन प्रा. लि., हुसको हायड्रॉलिक्स, अॅटलास कोपको, ओगनिबेनी इंडिया लि., पॉस्को आयपीपीसी प्रा. लि., चिकात्सो इंडिया, शेफ्लर इंडिया, के.एस.एच प्रा. लि., ए.एम लाइटिंग, बोर्गवॉर्नर इंडिया, व्हिटेस्को टेक्नॉलॉजी, एस.एच. पिटकर ऑर्थोटूलिंग, विनोआ २ एफी आदी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

TDIA च्या या बैठकीत घेतलेले निर्णय उद्योग क्षेत्राचा विकास, वाहतूक व्यवस्था सुधारणा, वीज पुरवठा स्थैर्य आणि स्थानिक कामगार व समाजाच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.या सर्व निर्णयांमध्ये आमदार सुनील शेळके यांची सक्रिय भूमिका आणि पुढाकार उद्योगनगरीच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरणार आहे, असे सर्वांचे एकमत झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!