Homeमहत्त्वाचेऑफिसला जातो म्हणत निघालेला बँक अधिकारी लायन्स पॉइंटच्या दरीत मृतावस्थेत; अपघात की...

ऑफिसला जातो म्हणत निघालेला बँक अधिकारी लायन्स पॉइंटच्या दरीत मृतावस्थेत; अपघात की घातपात, पोलिसांसमोर रहस्य

ऑफिसला जातो म्हणत निघालेला बँक अधिकारी लायन्स पॉइंटच्या दरीत मृतावस्थेत; अपघात की घातपात, पोलिसांसमोर रहस्य

लोनावळा: लोणावळा परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली असून, ऑफिसला जातो असे सांगून घरातून निघालेल्या एका तरुण बँक अधिकाऱ्याचा मृतदेह लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथील सुमारे ७०० फूट खोल दरीत आढळून आला आहे. या घटनेमुळे लोणावळा तसेच पुणे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यू अपघाती की घातपात, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.

परेश सूर्यकांत हटकर (वय ३८, रा. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे) असे मृताचे नाव असून ते बँक ऑफ इंडिया येथे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. शुक्रवार (ता. २) रोजी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास परेश हटकर हे नेहमीप्रमाणे बँकेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही काहीच माहिती न मिळाल्याने शनिवारी (ता. ३) सकाळी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांना हटकर यांची कार लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरातील वाहनतळावर उभी असल्याचे आढळून आले. तसेच त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशनही याच भागातील असल्याने पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग बचाव पथकाच्या मदतीने दरीत शोधकार्य सुरू करण्यात आले.

रोपच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून पाहणी केली असता परेश हटकर यांचा मृतदेह आढळून आला. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत शिवदुर्ग बचाव पथकाने मोठ्या शिताफीने मृतदेह टायगर पॉइंटच्या दरीतून वर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

परेश हटकर यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते स्वतः दरीत पडले की कुणीतरी त्यांना ढकलले, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून पोलिसांसमोर मोठे कोडे उभे राहिले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे हटकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, लोणावळा परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण शोध व बचाव मोहिमेत शिवदुर्ग बचाव पथकाच्या सदस्यांनी दाखवलेले धाडस, शिस्त आणि माणुसकीचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!