Homeसामाजिकगणेशोत्सवात शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे १०१ गरजूंना अन्नदान

गणेशोत्सवात शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे १०१ गरजूंना अन्नदान

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि ऐक्याचा सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत तळेगाव दाभाडे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण १०१ गरजूंना पोळी-भाजी, मसाले भात, गोड पदार्थ आणि मोदक प्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले.

या अन्नदान उपक्रमाचे नेतृत्व श्रीमती लिपिका अविनाश शेलार आणि श्रीमती मिनाक्षी शेलार यांनी केले. गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करत आहे.

याप्रसंगी बोलताना श्रीमती लिपिका शेलार म्हणाल्या,

“गणरायाची खरी सेवा म्हणजे समाजातील उपेक्षितांना आनंद देणे. त्यासाठीच हा अन्नदान उपक्रम हाती घेतला. पुढेही आम्ही असे विधायक उपक्रम सातत्याने राबवत राहू.”

तसेच संस्थेचे विश्वस्त अनिरुद्ध शेलार म्हणाले की,

“शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात अन्नदानाबरोबरच शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही होणार आहेत.”

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या देशमुख, सुनिता निकम, पूनम जाधव, तन्वी शेवकर, लहू सोनवणे, संचित अरनाळे, संस्कार अरनाळे आणि अंशुल शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! दोन वर्षं जुना विसर्जन हौद ‘डेंगू प्लांट’ बनला

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! दोन वर्षं जुना विसर्जन हौद ‘डेंगू प्लांट’ बनला   तळेगाव दाभाडे : शहरात विकासाच्या नावाने लाखो रुपयांचे फुगवलेले दाखले मिरवणारी तळेगाव दाभाडे...

तळेगाव दाभाडेत श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणेचे जल्लोषात स्वागत; वारकर्‍यांचा उत्साह ओसंडून वाहिला

तळेगाव दाभाडेत श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणेचे जल्लोषात स्वागत; वारकर्‍यांचा उत्साह ओसंडून वाहिला   तळेगाव दाभाडे : श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या श्री अलंकापुरी पंचक्रोशी...

गणपती चौक–घोरावाडी स्टेशन परिसरात उंदीर-घुशींचा कहर; बंदिस्त गटारांची साफसफाई ठप्प, नागरिक त्रस्त

गणपती चौक–घोरावाडी स्टेशन परिसरात उंदीर-घुशींचा कहर; बंदिस्त गटारांची साफसफाई ठप्प, नागरिक त्रस्त   तळेगाव दाभाडे:गणपती चौक ते घोरावाडी स्टेशन या मुख्य मार्गावरील बंदिस्त गटारांची साफसफाई कोलमडल्याने...

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्साहात साजरी   तळेगाव दाभाडे : श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात त्यांच्या...

पाणी समस्या सोडवण्याची ताकद ग्रामस्थांतच — पानी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणाला तळेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

पाणी समस्या सोडवण्याची ताकद ग्रामस्थांतच — पानी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणाला तळेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद   तळेगाव दाभाडे : पाणी हा केवळ नैसर्गिक स्रोत नसून भवितव्य घडवणारी...

error: Content is protected !!