
गोल्डन रोटरी चा अनोखा उपक्रम, आजचे प्रयोग,उद्याचे वैज्ञानिक
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६” या भव्य विज्ञान प्रदर्शनाला शाळा, विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर कार्यक्रमास औपचारिक सुरुवात झाली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालय अँड लॉन्स येथे झाली. कार्यक्रम सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होता. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.


या विज्ञान प्रदर्शनात ५० पेक्षा अधिक शाळांनी सहभाग घेतला, तर एकूण १६० हून अधिक विज्ञान प्रकल्प (प्रयोग) सादर करण्यात आले. यामध्ये सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तसेच अनेक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण वैज्ञानिक श्री. चिराग खळदे यांनी केले. त्यांच्या समवेत कॅरिंग हँड्स संस्थेचे श्री. अंबादास शिंदे सर यांनी देखील परीक्षण करून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह-प्रकल्प प्रमुख रो. दिपाली शिंदे यांनी केले. प्रोजेक्ट चेअरमन रो. दिक्षा वायकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट नंबर व इतर घोषणा रोटरॅक्ट अध्यक्ष रो. ललित देसले यांनी केल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाईस प्रेसिडेंट रो. प्रशांत ताए यांनी केले. कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेला लकी ड्रॉ ट्रेनर रो. दीपक फल्ले यांच्या स्पॉन्सरशिपमुळे घेण्यात आला. लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
या भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट चेअरमन व सह-प्रोजेक्ट चेअरमन यांनी विशेष मेहनत घेतली, त्यांना रोटरी व रोटरॅक्टच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य रो. धनश्री काळे, रो. सुजाता देव, रो. हर्षद जव्हेरी, रो. प्रशांत ताए, रो. दिनेश चिखले, रो. विजय गोपाळे, रो. बसप्पा भंडारी, रो. निखिल महापात्रा, रो. सौरभ मेहता,सेक्रेटरी रो. प्रदीप टेकवडे उपस्थित होते.
रोटरॅक्ट क्लबकडून ललित देसले, साक्षी जयकर, मेघना सांडभोर, किमया तांबोळी, समर्थ रेवनशेट्टी, श्रेया दिवटे, कमलेश चौधरी, कुणाल जाधव, ऋषिकेश नलावडे, गौरव टकले यांनी स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. एकूणच “अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६” हा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ देणारा, विज्ञानाची गोडी निर्माण करणारा आणि भविष्यातील शास्त्रज्ञ घडवणारा विज्ञानाचा खऱ्या अर्थाने उत्सव ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११



















